हिंजवडीत हत्याराने मारहाण करत मित्राचा खून करून मृतदेह मोकळ्या प्लॉटमध्ये फेकला

हिंजवडी : हत्याराने कपाळावर, हातावर, छातीवर मारहाण करून एकाला गंभीर जखमी करून त्याचा खून केला. मुळशी तालुक्यातील नेरेदत्तवाडी येथे गुरुवारी (दि. 31) खुनाचा हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

गणेश रामदास पिंजण (वय 35, रा.कासारसाई, ता. मुळशी), असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी वरप दिनेश रामदास पिंजण (वय 33, रा. नेरेदत्तवाडी, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नवनाथ शेडगे,
ल ऋषिकेश भिंताडे (दोघे रा. कासारसाई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत गणेश आणि आरोपी शेडगे व भिंताडे हे मित्र होते.आरोपींनी गणेश यांना अज्ञात कारणावरून हत्याराने कपाळावर, हातावर व छातीवर मारहाण केली. त्यात गंभीर जखमी होऊन गणेश यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा मृतदेह नेरेदत्तवाडी येथील मोकळ्या प्लॉटमध्ये फेकून दिला. हा प्रकार गुरुवारी दुपारी उघडकीस आला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.