बेकायदेशीरपणे गुटखा, पान मसाला वाहतूक करणाऱ्या तीन जणांना अटक

पिंपरी चिंचवड : बेकायदेशीरपणे गुटखा, पान मसाला वाहतूक करणाऱ्या तीन जणांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलीसांनी अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.1) कुदळवाडी, चिखली याठिकाणी ही करण्यात आली.

इमरान तबारक खान (वय 19, रा. कुदळवाडी, चिखली), शफीउल्ला सोहेल खान (वय 23, रा.आकुर्डी) व विजयकुमार राजमन गोंड (वय 34, रा. चिखली) यांना अटक करण्यात
ल आली. याप्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई मारूती व्यकंटराव जायभये यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी हे पान टपरीधारक आहेत. त्यांना विक्री करण्यासाठी बेकायदेशीरपणे गुटखा, पान मसाला वाहतूक करून घेऊन जाताना अटक करण्यात आली.
चिखली पोलीस अधिक तपास करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.