महिला व मुलींच्या च्या करिता डिजिटल फोटोग्राफी शिकण्याची संधी उपलब्ध

 

नाशिक:राज्यातील शासकीय आणि खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत म्हणजेच आयटीआय मध्ये प्रवेश घेण्यास अजून एक संधी उपलब्ध झाली असून महिलांनी आपला प्रवेश त्वरित निश्चित करावा असे आवाहन त्र्यंबकरोड वरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) यांच्यातर्फे करण्यात आले आहे या संस्थेत महिलांसाठी डिजिटल फोटोग्राफी हा राज्यातील एकमेव कोर्स उपलब्ध असून डिजिटल फोटोग्राफीचे अत्यंत शास्त्रशुद्ध आणि व्यावसायिक ज्ञान या संस्थेत महिलांना उपलब्ध आहेे.

शिवाय हा कोर्स पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना मिळणाऱ्या शासकीय प्रमाणपत्र नंतर नोकरी आणि व्यवसाय करून अर्थार्जन करण्याची आणि कुटुंब चालविण्याची मोठी संधी उपलब्ध होते व्यवसाया करिता शासनाच्या विविध योजनांत कर्ज उपलब्ध आहेत कर्ज मिळण्या करिता या शासकीय प्रमानपत्राचा मोठा उपयोग होतों फोटोग्राफीच्या व्यवसायत महिलांसाठी मोठ्या संधी उपलब्ध असून महिलांसाठी व्यवसायात कॉम्पीटीशन ही फारशी नाही त्यामुळे महिला फोटोग्राफरला या क्षेत्रात मोठी मागणी आहे काही नवीन करण्याची आणि वेगळ्या वाटा निवडण्याची आवड असणाऱ्या तरूणी करिता ही विशेष संधी आहे शिवाय अन्य व्यवसायाच्या तुलनेत कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय इनडोअर आणि आउटडोअर पद्धतीने करता येतो व्हिडिओ एडिटिंग फोटो एडिटिंग हा कॉम्प्युटरवर घरबसल्या करण्याचा व्यवसाय आणि भरपूर उत्पन्न हा फोटोग्राफी व्यवसाय एक अविभाज्य अंग डिजिटल फोटोग्राफी मध्ये निर्माण झाले असून महिलांकरिता त्यामध्ये खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत.

औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची याठिकाणी डिजिटल फोटोग्राफी करिता अद्याप काही जागा उपलब्ध असुन दिनांक 1 ते 4 जानेवारी दरम्यान ऑनलाइन लिंक वर प्रवेशप्रक्रिया उपलब्ध आहे मुलींच्या आयटीआय मध्ये अत्यंत सुरक्षित वातावरणात आधुनिक सुविधा मध्ये विविध औद्योगिक प्रशिक्षण घेऊन महिला आत्मनिर्भर होत आहेत व अर्थार्जन करून स्वतःचा व कुटुंबाचा विकास करीत आहेत ज्या महिलांना अर्थार्जन करण्यासाठी जास्तीत जास्त आर्थिक लाभ आणि कमी गुंतवणुकीच्या व्यवसायाची गरज आहे त्यांच्यासाठी डिजिटल फोटोग्राफी हा उत्तम पर्याय असून महिलांनी या संधीचा त्वरित लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची फॉरेस्ट ऑफिस समोर त्रंबक रोड नाशिक फोन नंबर02532313514 किंवा 8329742826 वर संपर्क साधावाअसे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.