मुंबईत थर्टी फर्स्टच्या पार्टीत मैत्रिणीची हत्या, दोघांना अटक

मुंबई: खार येथे थर्टी फर्स्ट पार्टीत झालेल्या मारहाणीत एका तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जान्हवी कुकरेजा असे या १९ वर्षीय तरुणीचे नाव असून खार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करीत पार्टीमध्ये सहभागी झालेल्या एका जोडप्याला अटक केली आहे. श्री जोगधनकर आणि दिया पाडणकर यांना अटक केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,खारमधील भगवती हाईट्स या इमारतीच्या टेरेसवर गुरुवारी थर्टी फर्स्ट पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. इमारतीमधील रहिवाशी तसेच त्यांची काही जवळची मित्र मंडळी या पार्टीमध्ये सहभागी झाले होते. जान्हवी पार्टीत सहभागी होण्यासाठी टेरेसवर पोहचली त्यावेळी एक जोडपे आक्षेपार्ह स्थितीत तिथे बसले होते. जान्हवीने आपल्या बॉयफ्रेंडला तिच्याच एका मैत्रिणीसोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं होतं. यानंतर या जान्हवीने आपल्या बॉयफ्रेंडला घडलेल्या प्रकाराबाबत जाब विचारला. यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि जन्व्हावीचा बॉयफ्रेंड आणि तिच्याच मैत्रिणींनी तिच्यावर हल्ला केला.

जान्हवी कुकरेजा ही बिल्डिंगमधील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या घरात जात असताना तिच्या बॉयफ्रेंड आणि तिच्या मैत्रिणीने तिला पायऱ्यांवरून उतरताना धक्का दिला, असंही पोलिसांनी सांगितलं. खार पोलिसांनी अधिक माहिती देताना म्हंटलं की, या प्रकारामुळे कदाचित तिच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला असू शकतो. ते पुढे म्हणाले की, एका पोलिस पथकाने त्या इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज गोळा केले आहे, ज्यामध्ये पीडितेचा प्रियकर काही जखमांसह इमारत सोडताना पाहायला मिळाला. पार्टीमध्ये उपस्थित असलेल्या इतर सात जणांची चौकशी केल्यानंतर पोलिसांना आढळले की, 24 वर्षीय तरुण जो की तरुणीचा बॉयफ्रेंड होता तो तिची फसवणूक करत होता.

पोलिसांना, “तपास करत असताना आम्हाला असेही आढळले की, लढाईदरम्यान मुलीचे मोठ्या प्रमाणात केस ओढले गेलेत. सोबतच तिच्या शरीरावर पाठीवर आणि खांद्यावर काही जखमा आढळल्या आहेत. वादावादीचे रूपांतर भांडणात होऊन या तिघांमध्ये हातापायी झाली असल्याची शक्यता पोलिसांनी बोलून दाखवली.

याप्रकरणी खार पोलिसांनी मुलीचा बॉयफ्रेंड आणि तिच्या मैत्रिणीवर खुनाचा गुन्हा दाखल केलाय. प्रथम दर्शनी ही हत्याच असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. मुलीची मैत्रीण आणि बॉयफ्रेंड तसेच इतर सात जणांची चौकशी केल्यावर पोलिस या निष्कर्षावर आले आहेत, असं डीसीपी एस चैतन्य यांनी म्हटलंय.

 

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.