सावधान महिलांनो, अनोळखी व्यक्तींकडून महिलांना व्हिडिओ कॉल

पुणे: सोशल मिडीया चे जेवढे फायदे आहेत त्याहून कित्तेक पटीने तोटे असल्याचे लक्षात येत आहे. महिलांचे नंबर सोशल मीडिया मार्फत मिळवुन संबंधित महिलांना व्हिडिओ कॉल केला जातो.महिला अचानक आलेल्या व्हिडिओ कॉल हा परिचयाचे व्यक्ती ने केला असेल असे समजून तो फोन उचलते. फोन उचलताच समोरील व्यक्ती ही नग्न असून काही करण्या अगोदरच संबंधित महिलेचा स्क्रीन शॉट काढला जातो.

पुण्यातील महिलांच्या नामांकित फेसबुक ग्रुप वर एका महिलेने तिचा अनुभव शेअर केला तिने पुढे म्हंटले की मला एका नंबर वरून तीन वेळा व्हिडिओ कॉल आले त्यातील दोन वेळा उचलला नाही.कोणीतरी ओळखीची व्यक्ती असेल असे समजून तिसऱ्या वेळा उचलला, फोन उचलताच काही समजण्याच्या आतच समोरील व्यक्ती ही पूर्णपणे नग्न स्वरूपात होती. सदर अनुभव पाहता ती महिला घाबरली व तिने हा अनुभव महिलांच्या ग्रुप वर शेअर केला असता,तसाच काही अनुभव इतर महिलांना आल्याचं लक्षात आले.तेथील काही महिलांच्या सांगण्यानुसार अशाप्रकारे आलेल्या व्हिडिओ कॉलवर संबंधित नग्न व्यक्तीचे व महिलेच्या चेहऱ्याचे स्क्रींशोट द्वारे फोटो काढले जातात व त्या महिलेला ब्लॅक मेल केले जाते,संबंधित अनुभव आलेल्या महिलेने इतर महिलांना आवाहन केले की आपण असे अनोळखी व्हिडिओ कॉल उचलू नका….

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.