अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक, 63 ग्रॅम मेफोड्रोन जप्त

पुणे : अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तरुणाला सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 8 लाख 9 हजार रुपये किमतीचा 63 ग्रॅम ‘मेफोड्रोन’ साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रूक येथे करण्यात आली. मोहमंद अब्दुल रहमान इरशाक (वय 23, रा. मुंढवा, मूळ- केरळ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,सिंहगड पोलीस ठाण्याचे पोलिस पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी दुचाकीवरून एक तरुण अमली पदार्थ विक्रीसाठी वडगाव बुद्रूक परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी किशोर शिंदे आणि धनाजी धोत्रे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मोहमंदला ताब्यात घेतले. त्याच्याकडे 8 लाख 9 हजारांचे 63 ग्रॅम मेफेड्रोन आढळून आले. पोलिसांनी मोहमंदविरूद्ध एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याच्याकडील अमली पदार्थ जप्त करण्यात आला.

 

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.