अवैधरित्या मटका जुगार खेळणाऱ्यावर वाकड पोलिसांनी छापा

पिंपरी चिंचवड :  अवैधरित्या मटका जुगार खेळणाऱ्यावर वाकड पोलिसांनी छापा मारून दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 2) दुपारी साडेपाच वाजता कस्पटे वस्ती, वाकड येथे गणेश मंदिराजवळ करण्यात आली.

बाबुलाल ज्योतीराम दंदी (वय 53), मछिंद्र प्रभू बनसोडे (वय 36, दोघे रा. कस्पटे वस्ती, वाकड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस नाईक सागर वामन सूर्यवंशी यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कस्पटे वस्ती, वाकड येथे गणेश मंदिराजवळ मोकळ्या जागेत जुगार मटका अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा लावून जुगार अड्यावर छापा मारला. त्यात बाबुलाल आणि मछिंद्र या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण एक हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.