अवैध गुटखा वाहतूक करणारा आरोपी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात

पौड : पिरंगुट (ता.मुळशी) येथे अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्यांवर पौड पोलिस स्टेशन व एल.सी.बी.पुणे ग्रामीण पथकाने कारवाई केली. यामध्ये अडीच लाख रुपये किमतीचा गुटखा व ओमनी कार असा साडेतीन लाख किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक देवकर यांनी दिली.

कार चालक रामलाल छौगाजी चौधरी (वय ४३, रा. पिरंगुट कॅम्प) व काळुराम पवळे (अल्पवयीन) ता.मुळशी) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,ग्रामपंचायत निवडणूक अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना, पौड पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व त्यांचा स्टाफ तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस अधिकारी व स्टॉप असे संयुक्तपणे पौड पोलिस स्टेशन हद्दीतील पिरंगुट घाटामध्ये पेट्रोलिंग करीत असताना पौड पोलिस स्टेशन हद्दीतील पिरंगुट घाटामध्ये पेट्रोलिंग करत असताना पुण्याच्या दिशेने पौडकडे एक मारुती ओमनी (एमएच. १२ एचएन.३०२८ ) ही भरधाव वेगात संशयितरित्या जात असल्याचे लक्षात आले. तिला थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन भरधाव वेगात पुढे घेऊ गेले. त्यानंतर कारचा पाठलाग करून तिला पिरंगुट गावातील बसस्थानक परिसरात ताब्यात घेतले. त्यावेळी कारमध्ये पोते फोडून पाहिले तेव्हा त्या पोत्यात विमल पानमसाला नावाचा सुगंधी तंबाखू व गुटखा मिक्सचे 8 पोती, व ओमणी कार असा एकूण किंमत रुपये ३ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला

ही कामगिरी पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट ,पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ,सहा.पोलीस निरीक्षक विनायक देवकर,पोलीस उपनिरीक्षक धोंडगे,सहा.फौजदार दत्ता जगताप, राजेंद्र पुणेकर, नितीन रावते, चंद्रशेखर हगवणे ,विनायक भोईटे यांनी केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.