राजकीय मतभेदातून झालेल्या वादामुळे मारहाण आणि गाड्यांची तोडफोड, नऊ आरोपी अटकेत
खेड :राजकीय मतभेदातून झालेल्या वादामुळे मारहाण आणि गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. वाढदिवसाला झालेल्या शाब्दिक बाचाबाचीच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत चौदा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर, त्यापैकी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी (दि. 31) रात्री दहाच्या सुमारास सायघवस्ती बोरदरा, खेड याठिकाणी हि घटना घडली.
निखील सुरेश पडवळ, मंगेश बाळासाहेब पडवळ, दत्त सुरेश पडवळ, महेश बाळु पडवळ, अजित फक्कड पडवळ, रविंद्र नथु पडवळ, विशाल नथु पडवळ, तुषार कान्हु पडवळ, अक्षय संतोष आरगाडे या नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय बबलु मच्छिंद्र पडवळ, अनिल लक्ष्मण पडवळ, निखील लक्ष्मण पडवळ, फक्कड राजाराम पडवळ, मच्छिंद्र राजाराम पडवळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी नवनाथ बबन पडवळ (वय 35, रा. बोरदरा, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,आरोपींनी गर्दी जमवत फिर्यादी नवनाथ यांचा भाऊ किरण पडवळ याच्याशी असलेल्या राजकिय मतभेद आणि एका वाढदिवासाच्या कार्यक्रमात झालेल्या शाब्दिक बाचाबाचीच्या कारणावरून नवनाथ यांच्या चारचाकीच्या त्यांची चारचाकी आडवी लावली. आरोपींनी हातातील लोखंडी रॉड व दगडाने नवनाथ यांच्या गाडीचे नुकसान केले. तसेच फिर्यादी यांच्यासह त्यांच्या सोबत असलेल्या इतर तिघांना लाथाबुक्यांनी माराहाण करून दुखापत केली. पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!