वानवडी परिसरात जागेवर ताबा मारत विधवा महिलेला धमकवल्याचा प्रकार उघडकीस, पिट्याभाईवर गुन्हा दाखल

पुणे :  वानवडी सारख्या परिसरात विधवा महिलेची जागा हडप करून तिला  धमकवल्याचा प्रकार पोलिसांनी उजेडात आणला आहे. पाच वर्षांपासून ताबा मारत या जागेवर भाडेकरू ठेवले होते. अनेकवर्षं प्रयत्न करून देखील महिलेला न्याय मिळत नव्हता. मात्र, वानवडी पोलिसांनी महिलेला न्याय दिला आहे

याप्रकरणी मेहबूब शेख उर्फ पिट्याभाई (रा. हडपसर),जावेद शेख उर्फ बिल्डर, शाम सुसगोहीरे, दिनकर सुसगोहीरे, शामराव गायकवाड(सर्व रा.वानवडी) यांच्या विरुद्द जागा हडप करणे, धमकावणे यासह इतर कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुंबईतील एका महिलेने फिर्याद दिली आहे.पिट्याभाई सीआयडी अधिकारी किंवा पत्रकार असल्याचे सांगत अनेकांना धमकावत असल्याची बाबही पोलीस तपासात पुढे आली आहे. त्याने या प्रकारे कोणाची फसवणूक केली असल्यास वानवडी पोलिसांनी माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अंधेरी ईस्ट (मुंबई) येथे रहाणाऱ्या विधवा महिलेची सय्यदनगर सर्व्हे न 75 मध्ये मालकी हक्काची जागा होती.यादरम्यान पिट्याभाई व त्याच्या साथीदारांनी जागेचा बनावट दस्तऐवज बनवला. यानंतर महिलेच्या जागेवर ताबा मारून पत्र्याच्या खोल्या बांधून त्या बांगलादेशी नागरिकांना भाड्यानं दिल्या. याबाबत त्यानी आवाज उठवला असता त्यांना घरी जाऊन धमकावले जात असे. तसेच त्यांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या देत. दरम्यान त्या न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करत होत्या. मात्र न्याय मिळत नव्हता. याबाबत त्यांनी यावेळी धाडस करून वानवडी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी देखील त्यांना तात्काळ धीर देत कारवाईचे आश्वासन दिले. महिलेने मेहबून शेख उर्फ पिट्याभाई याचे लँड माफिया तसेच गॅंगवारशी संबंध असल्याचे म्हंटले असून, त्याचे पुरावे सादर केले आहेत. पोलिसांनी पूर्ण शहानिशा करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजकारणी व नामांकित गुंडाबरोबर छायाचित्र 

मेहबूब शेख उर्फ पिट्याभाई पोलीस निरीक्षकाचा गणवेश घालून नागरिकांना मी सीआयडी ऑफिसर आहे,ह्यूमन राईट्‌सचा पदाधिकारी व परिवर्तन संस्थेचा अध्यक्ष आहे तसेच पत्रकार असल्याची तोतयागिरी व बतावणी करत होता. याप्रकारे दहशत माजवत जागा लुबाडने,खंडण्या गोळा करणे असे उद्योग करत असतो. तसेच विविध मान्यवर आणि राजकारणी व नामांकित गुंड यांच्यासोबतचे फोटो दाखवून हे नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत असतो. पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार वानवडी पोलिसांनी दाखल केले आहेत. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक जोगदंड करत आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.