खोटे दस्तऐवज बनवून करोडोंचा गंडा घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

पुणे : खोटे दस्तऐवज बनवून करोडोंचा गंडा घालणारी टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना वाघोली येथून अटक करण्यात आली आहे. आरोपींनी मौजे आव्हाळवाडी येथील जमीन बनावट दस्तऐवज तयार करुन बळकावण्याचा प्रयत्न केला होता.

भैरवनाथ बाबुराव साळुखे (वय- 32 रा.धायरकर कॉलनी, कोरेगाव पार्क), योगेंद्र रघुनाथ खिस्ते (वय- 38 रा.अल्फा प्रीमियर, विमाननगर), संदीप सेवकराम बसतानी (वय- 38 रा. फ्लॅट नं 502, लक्ष्मी इंक्लेव, लोणकर वस्ती, मुंढवा), सुदेश संभाजी राव (वय 34 रा.सुदर्शननगर, पिपळे गुरव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अपूर्व सुभाषचंद्र नागपाल (वय- 49 रा. क्लेवर हिल्स कोंढवा) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मौजे आव्हाळवाडी येथे चार एकर जमीन असून याठिकाणी फार्म हाऊस आहे. 28 डिसेंबर 2020 रोजी काही लोकांनी जागेवर जेसीबी घेऊन आले असून ते जागेची साफसफाई करत असल्याचे समजले. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली. त्यावेळी आरोपींनी ही जमीन अपूर्व नागपाल यांच्याकडून 7 कोटी 50 लाख रुपयांना खरेदी केल्याचे सांगितले. तसेच अपूर्व नगापाल यांना 1 कोटी रुपये दिले असून उर्वरीत रक्कम खरेदीखताच्या दिवशी देणार असल्याचे सांगितले.

त्यावेळी फिर्यादी यांनी आपणच अपूर्व नागपाल असून आपली या आधी कधीच भेट झाली नसून त्यातील आरोपी यांनी खोटा दस्तऐवज व खोटे क्षेत्र मालक बनवून फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात आले. अपूर्व नागपाल यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली.या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करत असताना आरोपी वाघोली गावात येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी वाघोली गावात सापळा रचून आरोपींना अटक केली. पुढील तपासासाठी आरोपींना लोणीकंद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, सहाय्यक फौजदार दत्ता जगताप, पोलीस हवालदार अनिल काळे, पोलीस नाईक गुरू जाधव, अभिजित एकशिंगे, पोलीस शिपाई बाळासाहेब खडके, चालक पोलीस हवालदार प्रमोद नवले यांच्या पथकाने केली.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.