नागपूरमध्ये 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

नागपूर :महिलांवर होणाऱ्या अत्याचार रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात असताना नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथून सर्वांना हादरून टाकणारी माहिती समोर आली आहे. रामटेक तालुक्यात खिंडसी या पर्यटन क्षेत्राच्या शेजारी टेकडीवर एका 14 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पीडित मुलीच्या मित्रानेच तिचा घात केल्याचे समजत आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून स्थानिक पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

अतुल हटवार, धीरज, होमदास, सौरभ हर्षल असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच त्यांच्या विरोधात अपहरण, सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यासह अॅट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हे नोंदवले गेले आहेत

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी 29 डिसेंबरला अतुल हटवार या तरुणासोबत खिंडसी परिसरात गेली होती. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आरोपी अतुल हटवार याने फोन करून त्याचे इतर चार मित्र धीरज, होमदास, सौरभ आणि हर्षल यांना बोलावून घेतले. पाचही मित्रांनी पीडित तरुणीसोबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. पीडितेने रात्री उशिरा घरी पोहोचल्यावर आई वडिलांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर काल रात्री (2 जानेवारी 2021) पीडित मुलीच्या पालकांनी रामटेक पोलीस स्टेशनला तक्रार दिली. आज पाचही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात अपहरण, सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यासह अॅट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हे नोंदवले गेले आहे. महिला पोलीस अधिकारी घटनेचा तपास करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.