बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक, गावठी पिस्टलसह तीन काडतुसे जप्त
पिंपरी चिंचवड : विनापरवाना आणि बेकायदेशीररीत्या गावठी पिस्टल जवळ बाळगणाऱ्या दोघांना चिखली पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि.2) रात्री पावणे बाराच्या सुमारास चिखली येथील भिमशक्ती नगर झोपडपट्टीत सापळा रचून करण्यात आली. त्यांच्याकडून गावठी पिस्टल आणि तीन काडतुसे असा एकूण 41 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
किरण महादेव बनसोडे (वय-32 रा. भिमशक्ती नगर झोपडपट्टी, मोरेवस्ती, चिखली), जयभिम भिका भालेराव (वय-26 रा. भिमशक्ती नगर, झोपडपट्टी, मोरेवस्ती, चिखली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई संतोष बिभिषण सपकाळ यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली येथील भिमशक्ती नगर झोपडपट्टीतील दोघांकडे पिस्टल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता 40 हजार रुपये किंमतीची गावठी पिस्टल आणि दीड हजार रुपये किमतीचे तीन जीवंत काडतुसे आढळले. पोलिसांनी पिस्टल आणि काडतुस जप्त करुन आरोपींना अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व्हि.बी. बढे करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!