मगरपट्टा परिसरात सापडलेल्या त्या मृतदेहाचे गूढ उकलले, चौघांना अटक

पुणे : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हडपसर मधील मगरपट्टा परिसरातील  उद्यानाजवल वर्दळीच्यावेळी एका मालवाहू टेंम्पोतून आणून टाकलेल्या मृतदेहाचे गुढ उकलले आहे. हपडसर आणि लोणी काळभोर पोलिसांनी संयुक्त कारवाई करुन या गुन्ह्यातील चौघांना अटक केली आहे. एका केटरर्सने आपल्याच एका कामगाराचा खून करुन, मृतदेह हडपसर हद्दीतील मगरपट्टा चौकातील फुटपाथवर फेकल्याचे निष्पन्न झाले आहे.

संतोष (संपूर्ण नाव माहित नाही) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी केटरर्स नारायण शंकर व्यास (वय – 30 रा. रामदरा रोड, साठेवस्ती, लोळी काळभोर, मुळ. रा. रेणवास, राजस्थान), जितेश तुकाराम कदम (वय-31 रा. साडेसतरानळी, हडपसर), संतोष सुंदर पुजारी (वय -35 रा. जनवाडी जनता वसाहत, गोखलेनगर, पुणे), संपत मारुती कंत्राळे (वय-41 रा. हडपसर भाईमंडई जवळ, हडपसर) यांना अटक केली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत रामचंद्र गायकवाड (वय-45) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी (दि.1) सकाळी दहाच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या पिकअपमधून आलेल्या चौघांनी मगरपट्टा चौकातील फुटपाथवर मृतदेह टाकून पळून गेले होते. चौकामध्ये गर्दी असल्याने मृतदेह टाकताना अनेकांनी पाहिले होते. या घटनेमुळे हडपसर परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह टाकणाऱ्यांची चौकशी परिसरात केली. त्यावेळी एका व्यक्तीने गाडीचा नंबर पोलिसांना दिला.

पोलिसांनी गाडीचा नंबर तपासला असता गाडी लोणी काळभोर येथील नारायण व्यास यांच्या मालकीची असल्याचे माहिती मिळाली. हडपसर पोलिसांनी लोणी काळभोर पोलिसांच्या मदतीने नारायण व्यास याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत मृतदेहाचे गुढ उकलले. दरम्यान, मयत संतोष याचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे शवविच्छेदन अहवालावरुन उघड झाले आहे. आरोपींनी संतोष याचा खून कोणत्या कारणावरुन केला हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.