मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, पॅराग्लायडर्सवर बंदी
मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात दि. 31 डिसेंबर 2020 ते 29 जानेवारी 2021 या कालावधीत ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलवर चालणारे मायक्रो लाईट एअर क्राफ्ट, एरिएल मिसाईल आदी तत्सम उपकरणीय वापरांवर (Flying Activities) बंदी आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे.
मुंबई पोलीस उपआयुक्त (संचलन) तथा कार्यकारी दंडाधिकारी एस.चैतन्य यांनी उपरोक्त आदेश निर्गमित केले असून हा आदेश तोडणाऱ्यांविरुद्ध सेक्शन 188 भा.दं.वि. 1960 नुसार कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात म्हटले आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!