खंडणीच्या गुन्ह्यात २ वर्षापासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक

पिंपरी चिंचवड :खंडणीच्या गुन्ह्यात २ वर्षापासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी (दि.४) टेल्को रोडवर अटक करण्यात आली.साहील उर्फ साईनाथ वसंत धोतरे (वय २१ रा. बालाजीनगर, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,धोतरे याच्यावर दोन वर्षापूर्वी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. धोतरे टेल्को रोडवरील विजय सेल्स समोर थांबला असल्याची माहिती तपास पथकाचे पोलीस अंमलदार शरद गांधिले व विजय दौंडकर यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.त्यांच्याकडे चोकशी केली असता त्याने सन २०१८ साली खडणीचा गुन्हा केल्याची कबुली दिली.त्यावरून पोलिसांनी त्याला अटक केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), प्रदिप पाटील, पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण, पोलीस अंमलदार शरद गांधिले, विजय दौंडकर, करण विश्वासे, अनिल जोशी, विशाल काळे, रहिम शेख यांच्या पथकाने केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.