नाशिक हादरलं! अनैतिक संबंधात आड येणाऱ्या मुलाचा बापानेच काढला काटा

नाशिक : पित्याचे विवाहबाह्य संबंधाचे गुपीत मुलाला माहित झाले आणि पत्याने दीड एकर शेती स्वत:च्या प्रेयसीच्या नावावर केल्याने त्यास मुलाने कडाडून विरोधही केला म्हणून मनात राग धरत पोटच्या २८वर्षीय तरुण मुलाचा गळा आवळून जन्मदात्या पित्याने खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून आरोपी पित्याला अटक केली असल्याची माहिती देण्यात आली

निलेश माळवाड असं मयत मुलाचं नाव असून प्रभाकर माळवाड असं आरोपी पित्याचं नाव आहे. याप्रकरणी  जयश्री माळवाड यानी फिर्याद आहे.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,आरोपी प्रभाकर माळवड हा देवळा सरकारी पशुसंवर्धन दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतो. गेल्या काही दिवसांपासून त्याचं एका महिलेसोबत प्रेमसंबंध जुळलं होतं. या अवैध प्रेमाच्या आहारी जावून त्यांनी संबंधित महिलेच्या नावावर जमीन करण्याचा निर्णय घेतला. याला 28 वर्षीय मुलगा निलेशनं विरोध केला. यातून हा वाद वाढत गेला आणि या वादाचं रुपांतर हत्येत झालं.

आपल्या प्रेयसीच्या नावावर जमीन करण्याचा हट्टापायी आरोपीनं आपल्या पोटच्या मुलाचा जीव घेतला आहे. यावेळी झटापटीत मृत मुलाच्या आईनं विरोध केला, तिलाही निर्दयी आरोपीनं मारहाण केली आहे.

स्थानिकांच्या ही बाब लक्षात येताच तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळावरून निलेशचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अधिक माहितीनुसार, आरोपी वडील प्रभाकर माळवाडला मुंबई नाका पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात पोलीस आरोपीच्या कुटुंबाची आणि शेजारच्यांशीही चौकशी करणार असून प्रकरणात अधिक तपास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे

 

 

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.