पुण्यात तेरा वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार, आरोपीला अटक

पुणे : एका 25 वर्षाच्या नराधमाने तेरा वर्षाच्या मुलावर लैंगिक
अत्याचार केल्याचा किळसवाणा प्रकार पुण्यातील हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पोस्को) गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे.

बाबासाहेब उर्फ पप्पू कालिदास थोरे असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित मुलगा हा मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास आई कामावरून घरी परत येण्याची वाट पाहत होता. त्यावेळी आरोपीने या मुलाला गप्पा मारण्याच्या निमित्ताने एका निर्मनुष्य इमारतीत नेले. त्यानंतर त्याने या मुलाला खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवत लैंगिक अत्याचार केले.

दरम्यान घाबरलेल्या या मुलाने कामावरून परत आलेल्या आईला हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्याच्या आईने हवेली पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरोधात तक्रार दिली.पोलीसांनी ही तत्काळ गुन्हा दाखल करत आरोपीला अटकही आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.