बाप रे, बचत गटाच्या नावाखाली त्या दोघींनी घातला १६ लाखांचा गंडा
पुणे : महिला बचत गटाच्या नावे 48 महिलांकडून दरमहा 1 हजार रुपये स्विकारून 16 लाख 56 हजार रुपयांची दोन महिलांनी फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. पौड पोलिसांनी त्या दोघींना अटक केली असून, न्यायालयाने 8 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मुळशी तालुक्यातील माले येथे 25 जानेवारी 2017 ते 15 ऑगस्ट 2020 या कालावधीत हा प्रकार घडला.
सविता भोलेनाथ घाग (वय 43) आणि स्वाती शिवाजी कदम (वय 35, दोघीही, रा. माले, ता. मुळशी) अशी त्या दोघांची नावे आहेत. याबाबत अर्चना चंद्रकांत शेंडे (वय 35) यांनी पौंड पोलिसात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,सविता आणि स्वाती या दोघींनी माले येथील 48 महिला गोळा करून 50 महिलांचा सियाराम महा महिला बचत गट चालू केला.दोघींनी प्रत्येक महिलेकडून दरमहा 1 हजार रुपये गोळा केले होते. या महिलांकडून गोळा केलेले लाखो रुपये त्यांनी बँक खात्यात न ठेवता स्वतःकडेच ठेवले होते.
बचत गटातील इतर महिलांनी या दोघींना वारंवार बँकेत खाते उघडण्यासाठी सांगत होते. परंतु त्यांनी शेवटपर्यंत खाते उघडले नाही. मागील तीन वर्षात 48 महिलांचे 16 लाख 56 हजार रुपये जमा झाले.अखेर बचत गटातील इतर महिलांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपींना अटकही केली.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!