किराणा दुकानात व फ्लॅटमध्ये गांजा विक्री, १५ किलो ८०९ ग्रॅम गांजा जप्त

पुणे  : किराणा दुकानात व फ्लॅटमध्ये गांजा विक्री करणाऱ्या एकाला हिंजवडी पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १५ किलो ८०९ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.

प्रेमसिंग रतनसिंग चंपावत (वय ३८, रा़.हिराई निवास, पाटीलनगर, बावधन) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.चंपावत हा मुळचा राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील राहणारा आहे. आरोपी राजस्थानमधून तस्करी करुन गांजा आणत असल्याचा पोलिसांना संशय आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बावधनमध्ये गांजा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी एका किराणा दुकानात व फ्लॅटमध्ये छापा टाकला तिथे पोलिसांना गांजा विक्री होत असल्याचे आढळून आले. या दोन्ही ठिकाणाहून पोलिसांनी १५ किलो ८०९ ग्रॅम गांजा, मोबाईल, वजनकाटा, गांजा भरुन ओढण्याच्या उपयोगाचा गोगो, रोख रक्कम असा ४ लाख ५८ हजार ९१५ रुपयांचा माल जप्त केला आहे. अधिक तपास पोलिस करतं आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.