क्‍यू आर कोड स्कॅन करताय? सावधान! 

पिंपरी चिंचवड : माहिती-तंत्रज्ञान युगात डिजिटल व्यवहार होत असले तरी धोक्‍याची घंटाही तितकीच मोठी आहे. थेट खात्यातून रक्कम गेल्यास त्याची तीव्रता समजते. नियमित गुन्ह्यांच्या तुलनेत सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. तुटपुंज्या मनुष्यबळावर सायबर विभागाचा कारभार सुरू आहे. ऑनलाइन फसवणूक व सोशल मीडियाच्या माध्यमातून घडणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांपेक्षाही दररोज नागरीक या ना त्या कारणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांच्या जाळ्यात अडकत आहेत. दररोजच्या गुन्ह्यांच्या तुलनेत सायबर गुन्हे वेगाने वाढू लागले आहेत. याचा प्रत्यय नागरीकांना पावलोपावली येऊ लागला आहे. एखाद्या माहितीपर्यंत पोहचण्यासाठी व एखाद्या व्यवहाराचे थेट पेमेंट करण्यासाठी “क्‍यूआरकोड’ची मदत घ्यावी लागत आहे. क्यू आर कोड मुळे आपली फसवणूक कशी होते तसेच या क्यू आर कोडमुळे फसवणूक कशी रोखता येईल ती पुढील प्रमाणे

क्यू आर कोड स्कॅम

१) क्यू आर कोड म्हणजे क्विक रिस्पॉन्स कोड . हा कोड मोबाईल अथवा तत्सम उपकरणाच्या सहाय्याने स्कॅन करून त्यातील माहिती वाचता येते . त्याकरिता मोबाईल कॅमेराच्या सहाय्याने हा कोड स्कॅन केला जातो. तो स्कॅन झाल्यावर त्यात दडवलेली माहिती उघड होते. डिजिटल पेमेंट करिता याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे . अगदी चहाच्या छोट्या दुकानापासून मोठ्या शॉपिंग सेंटर मध्ये Physical Contact टाळून सहज आणि सोप्या पद्धतीने खरेदीची बिल अदा करण्याकरिता याचा वापर होतो. संबंधित ठिकाणचा क्यू आर कोड आपले मोबाईल मधील Google Pay आणि तत्सम पेमेंट एप वापरून स्कॅन करायचा, बिलाची रक्कम नमूद करून आपला UPI पिन दाखल करून काही क्षणात आपला व्यवहार पूर्ण होतो.

२) क्यू आर कोड वापरून होणाऱ्या व्यवहारात पैसे देणारा ज्याला ते द्यावयाचे आहेत त्यांचा क्यू आर कोड स्कॅन करतो. पैसे घेणाऱ्याला क्यू आर कोड स्कॅन करण्याची गरज नाही.

क्यू आर कोडमुळे कशी होते फसवणूक

१) दिवाळी फराळ बनविणाऱ्या बचत गटाच्या महिलेला कॉल आला. त्यावर व्यक्‍तीने सांगितले की, “”मी सैन्यदलात अधिकारी आहे. सीमेवरील सैनिकांना दिवाळी फराळ पाठवायचा आहे. त्यासाठी विविध फराळ काही किलो हवा आहे. मागणी नोंदवा आणि बिलाची रक्कम देण्यासाठी क्‍यूआरकोड स्कॅन करा. हा सैन्यदलाचा नियम आहे.” यामुळे महिलेने त्यावर विश्‍वास ठेवून क्‍यूआर कोड स्कॅन केला. त्याचक्षणी तिच्या खात्यात पैसे जमा होण्याऐवजी तब्बल पन्नास हजार रुपये वजा झाले.

२) एक आय. टी. अभियंता तरुण त्याच्याकडे असणारा DSLR
कॅमेरा, त्याचा वापर होत नसल्याने त्याच्या विक्रीची जाहिरात OLX या खरेदी विक्रीच्या वेब साईटवर प्रसिद्ध केली. ती जाहिरात पाहून त्याला खरेदीदाराकडून संपर्क केला गेला. कॅमेरा ची प्राथमिक माहिती घेतल्यावर खरेदीदाराने २५००० रुपयांना तो कॅमेरा विकत घेण्याची तयारी दर्शविली. त्या तरुणाकडून त्याच्या बँकेची खात्याची
माहिती खरेदीदाराने घेतली आणि काही वेळात त्याचे स्वत:चे बँकेतून पैसे ट्रान्सफर करताना अडचणी येत आहेत असे सांगून एक क्यू आर कोड स्कॅन करण्यासाठी पाठविला. अपेक्षित किंमत मिळत असल्याचे आनंदात क्यू आर कोड स्कॅन करून स्वत:चा UPI पिन दाखल करून त्या तरुणाने ८९९९९ रुपये गमावले.

अशा प्रकारे शहरात मागील आठ महिन्यांत नऊ गुन्हे घडले आहेत. “क्‍यूआरकोड’ स्कॅन करणं म्हणजे चेकवर सही करण्यासारखं आहे. परिणामी, अशा सायबर गुन्ह्यांपासून स्वत:ची सुटका करण्यासाठी प्रत्यक्ष व्यवहारांवर भर देणं अपेक्षित आहे.

कयू आर कोडचा वापर करून आर्थिक व्यवहार करताना पुढील बाबी लक्षात ठेवा-

1. पैसे देणारा व्यक्ति हा पैसे देण्याकरिता स्वत:च्या यूपीआय किंवा मोबाईल वॉलेट चा वापर करून कयू आर कोड स्कॅन करतो आणि यूपीआय पिन दाखल करून पैसे ट्रान्सफर करतो. पैसे घेण्याकरिता कोणताही कयू आर कोड स्कॅन करण्याची गरज नाही.

2. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून त्यांचेकडून Whatsapp किंवा इतर माध्यमातून प्राप्त झालेले कयू आर कोड स्कॅन करू नका.

3. सायबर गुन्हेगार पुढील कारणे सांगून तुम्हाला संपर्क करू शकतात
-मोबाईल वॉलेटची कॅशबॅक ऑफर क्लेग करण्यासाठी
– तुम्ही ओएलएक्स वर विक्रीकरिता जाहिरात केलेली वस्तु खरेदी करण्याकरिता त्याची किंमत अदा करण्याचे कारण सांगून
– तुमच्याशी असणाऱ्या आर्थिक व्यवहारात तुमचे पैसे देण्याचे बहाण्याने
-हॉटेल अथवा ट्रॅवल बूकिंग करण्याकरिता

 

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.