लग्नाचे अमिश दाखवून महिलेचे अपहरण अन लैंगिक अत्याचार
पिंपरी चिंचवड : नातेवाईकाच्या ओळखीने घरात जाऊन महिलेशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून तिला लग्नाचे अमिश दाखवले. त्यातून तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. त्यानंतर तिला पळवून नेऊन एका कंपनीच्या गोडाऊन मध्ये वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याबाबत एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १० डिसेंबर दुपारी २ वाजल्यापासून ३० डिसेंबर सकाळी १० वाजेपर्यंत जाधव वाडी चिखली व गोदरेज कंपनीच्या गोडाऊन घडली.
सचिन पंडित चव्हाण (वय २४, रा. आरेगाव, ता. पुसद, जि. यवतमाळ) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित महिला मागील काही दिवसांपूर्वी चिखली परिसरातील जाधव वाडी येथे समोरासमोर राहण्यास होते. महिलेचा नातेवाईक आणि आरोपी एकाच गावातील असल्याने त्यातून आरोपी हा महिलेच्या घरी येत असे व बिगारीचे काम एकत्र केल्याने पीडित महिला आणि आरोपी सचिन यांच्यात ओळख सलोखा वाढून प्रेमसंबंध निर्माण झाले.
आरोपी सचिन याच्या घरी कोणी नसताना त्याने पिडीत महिलेस लग्नाचे अमिश दाखवून लैंगिक अत्याचार केले. तिला खासगी वाहनातून रांजणगाव येथे पळवून नेऊन गोदरेज कंपनीच्या गोडाऊनमध्ये तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!