अवैधरित्या दारु विक्री करणा-या समाधान हॉटेलवर पोलिसांचा छापा
पिंपरी चिंचवड :अवैधरित्या दारु विक्री करणा-या समाधान हॉटेलवर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारून २ जणाविरुद्ध दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून ६ लाख ६२ हजार ६२२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्रविण विलास मलवर (वय २८ रा.पद्मावतीनगर, चिंबळी ता. खेड जि. पुणे मुळपत्ता मु. पो. शिराळा ता. जाफ्राबाद जि. जालना) व इतर ०१ आरोपी यांंच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,ज्योतीबा मंदिर ते सोनावणे वस्तीकडे जाणारे रोडलगत समाधान हॉटेल, चिखली पुणे येथे हॉटेलमध्ये हॉटेलचा चालक मालक हा गिहाईकास विनापरवाना अवैधरित्या देशी-विदेशी दारूची व बियरची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांन मिळाली त्यानुसार पोलिसांनी हॉटेलवर छापा मारला. त्यामध्ये आरोपी ग्राहकांना हॉटेलमध्ये बसवून दारूची विक्री करताना आढळून आले. पोलिसांनी हॉटेलमधून ४४ हजार ९४० रुपये रोख रक्कम, ३७,६८२/- रु किं च्या देशी-विदेशी दारुच्या व बियरच्या वेगवेगळया कंपनीच्या बॉटल. ५.८०,०००/- रु किं ची एक ग्रे रंगाची मारुती सुझुकी स्वीफ्ट चारचाकी वाहन तिचा आरटीओ क्रमांक एमएच १४ एफएम ९९०७ असा एकूण ६,६२,६२२/- रू किं. चा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला.चिखली पोलिस अधिक तपास करत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!