अवैधरित्या सुरु असलेल्या कल्याण मटका जुगार अड्यावर पोलिसांचा छापा,तीन जणांवर गुन्हा दाखल
पिंपरी चिंचवड : अवैधरित्या सुरु असलेल्या कल्याण मटका जुगार अड्यावर पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभाग पोलिसांनी छापा मारला त्यात पोलिसांनी १८ हजार ५२० रुपयांचे मुद्देमाल जप्त केला आहे. तर, तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बालाजी चौक, भोसरी, पुणे येथे करण्यात आली.
मोहम्मद दस्तगीर शाह (वय ४४ रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी, पुणे) व इतर ०२ आरोपी अशी गुन्हा दाखल झालेल्यां आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,भोसरी कडुन टेल्कोकडे जाणाऱ्या रोडलगत असणाऱ्या सपना टी स्टॉलच्या समोर मोकळ्या जागेत, बालाजी चौक, भोसरी, पुणे येथे कल्याण मटका अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या जुगार अड्यावर छापा मारला. त्यात पोलिसांनी ७ हजार ५२० रुपये रोख रक्कम, ११ हजार रुपये किमतीचे मटका खेळण्यासाठी वापरलेले मोबाईल असा एकूण १८ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीविरुध्द एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन येथे गुरनं १०/२०२१ भादंवि क १८८.२६९.३४ महाराष्ट्र जुगार अधिनीयम क १२ अ साथीचे रोग अधिनीयम १८९७ क ३. राष्ट्रीय आपत्ती अधिनीयम २००५ चे कलम ५१(ब) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन करीत आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!