बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या तरुणाला अटक, एक पिस्तुल व एक जिवंत काडतुस जप्त

पुणे :  बेकायदेशीर पिस्तुल बाळगणाऱ्या एकाला पुणे गुन्हे शाखा एकच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून एक पिस्टल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

प्रेम रामदिन बाबु (वय २० रा.साई कृपा टी स्टॉल,मोर चौक,सुतारवाडी रोड,पाषाण,पुणे.मुळगाव रा.हस्ताम,ग्राम तकुली, ता.मबुआ,थाना अत्तारा, जि. बांधा (उत्तरप्रदेश) प्रदेश)) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार इम्रान शेख यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, संत रोहिदास उद्यान,कासेवाडी, भवानीपेठ, शंकरशेठ रोड,पुणे या ठिकाणी रोडवर एक तरुण थांबला असून, त्याच्याजवळ पिस्तुल आहे आणि  तो कोणतातरी दखलपात्र गुन्हा करण्याची शक्यता आहे. अशी खात्रीशीर बातमी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दुपारी तीनच्या सुमारास आरोपीस सापळा रचून अटक केली. यावेळी त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ गावठी पिस्टल व १ जिंवत काडतुसे असा एकूण ३१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी गुन्हे शाखा पुणे शहर चे अपर पोलीस आयुक्त, अशोक मोराळे, पोलीस उप- आयुक्त,गुन्हे  बच्चनसिंग, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-१ सुरेंद्र देशमुख यांचे मार्गदशनाखाली युनिट-१ गुन्हे शाखा, पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल ताकवले, पोलीस उप-निरीक्षक सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार,सतीश भालेकर इम्रान शेख,सचिन जाधव शशीकांत दरेकर,महेश बामगुडे,प्रशांत गायकवाड,तुषार माळवदकर यांनी केली आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.