मावळात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दहा जणांवर गुन्हा दाखल

मावळ : अवैधरित्या सुरु असलेल्या कल्याण मटका जुगार अड्यावर पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभाग पोलिसांनी छापा मारला. त्यात पोलिसांनी १५ हजार १८५ रुपयांचे मुद्देमाल जप्त केला आहे. तर, दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई मौजे दारुंब्रे ता. मावळ येथे करण्यात आली.

अविनाश चंद्रकांत सुर्यवंशी (वय २८  रा. संभाजी आरगडे यांचे भाडयाचे रुममध्ये, शिरगांव ता. मावळ जि. पुणे मुळपत्ता मु. पो. हनुमंतवाडी ता. निलंगा जि. लातूर) व इतर ०९ जुगार खेळणाऱ्या व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,संत तुकाराम महाराज उस कारखान्याजवळ, बाळु विठ्ठल वाघुले यांचे शेतजमीनी लगत दारुंब्रे गावाकडे जाणा-या रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी उघडया जागेत, बाभळीचे झाडाखाली, मौजे दारुंब्रे ता. मावळ येथे कल्याण मटका अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या जुगार अड्यावर छापा मारला.त्यात पोलिसांनी १५ हजार ३० रुपये रोख रक्कम, ४० हजार १०० रुपये किमतीचे दहा मोबाईल,५५/- रु किं चे कल्याण मटका नावाचा जुगार खेळण्याचे साहित्य.असा एकूण ५५ हजार १८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीविरुध्द शिरगाव परंदवडी पोलीस चौकी येथे गु.र.नं. १२/२०२१ भा.दं.वि. कलम भा.दं.वि. कलम १८८, २६९,३४ महा.जुगार कायदा कलम १२ अ. साथीचा रोग अधिनियम १८९७ कलम ३, राष्ट्रीय आपत्ती अधिनियम २००५ चे कलम ५१ (ब), महा.कोवीड १९ उपाययोजना २०२० चे कलम ११ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला असुन पुढील तपास शिरगांव परंदवडी पोलीस चौकी करीत आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.