मुंबईतून पुणे जिल्हयात ड्रग्सची तस्करी करणारा ड्रग्ज माफिया पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात

मावळ (सोमनाथ आव्हाळे) : मुबई शहरातुन पुणे जिल्हयात अंमली पदार्थ (ड्रग्ज) तस्करी करणारा ड्रग्ज माफियाला पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुरुवारी (दि.७) पहाटे नवी मुंबई मधून अटक केली आहे.

हसन बकरहुसेन सय्यद (वय ३२ वर्ष रा.पळस्पे ता.पनवेल जि.रायगड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याआधी पोलिसांनी शिवाजी मारुती कडू (वय ३२ वर्षे रा.कुरवंडे ता.मावळ) व सोमनाथ वसंत बालगुडे (वय ३० वर्षे रा.पाथरगाव ता.मावळ) याना अटक केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सोमवारी (दि. ४) खामशेत गावच्या हद्दीतुन अंमली पदार्थाची विक्री करणारे आरोपी शिवाजी याच्या मारुती ब्रिजा कारमधून ५२ ग्रॅम २० मिली ग्रॅम व आरोपी सोमनाथ याच्या अंगझडतीत १५ ग्रॅम १७ मिली ग्रॅम असा एकूण १ लाख ३४ हजार ७४० रुपये किंमतीची ६७ ग्रॅम ३७ मिली वजनाचे मेफेड्रोन (ड्रग्स) आंतरराष्ट्रीय बाजार किंमत रु २ हजार  प्रती ग्रॅम प्रमाणे व ५ लाख ३३ हजार ३६० रुपये किंमतीची कार, मोटारसायकल, वजनकाटा, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण ६ लाख ६८ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला होता. त्याबाबत कामशेत पोलिस स्टेशनला गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम  करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८(क), २१(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यामध्ये सध्या दोन आरोपी पोलीस कस्टडी रिमांड मध्ये आहेत.

सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास  बातमी मिळाली की गुन्हयातील अंमली पदार्थ (ड्रग्ज) सप्लाय करणारा हसन बकरहुसेन सय्यद (वय ३२ वर्ष रा.पळस्पे ता.पनवेल जि.रायगड) हा पनवेल येथे येणार आहे. त्यावरून गुन्हे शाखेचे पथकास त्या ठिकाणी जावून सापळा रचुन ड्रग माफिया हसन सय्यद यास पनवेल नवी मुंबई येथून ताब्यात घेण्यात आलेले आहे.

 ड्रग माफिया हसन सय्यद याचे आंतरराष्ट्रीय ड्रग माफियांशी संबंध असण्याची शक्यता असल्याने ड्रग्ज तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. आरोपी हसन सय्यद यास पुढील तपास कामी कामशेत पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिलेले असून त्याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी करीत आहेत.

 ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक विवेक पाटील, लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, सहाय्यक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सहाय्यक उपनिरीक्षक विजय पाटील, पोलीस हवालदार  प्रकाश वाघमारे, सुनील जावळे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, काशिनाथ राजापुरे यांच्या पथकाने केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.