रेशन कार्ड धारकांना आधार व मोबाईल नंबर लिंक करणे बंधनकारक; जाणून घ्या अंतिम मुदत

मुंबई : रेशनकार्डचा लाभ घेणाऱ्या प्रत्येकाला आता रेशनकार्ड आधार आणि मोबाइल क्रमांकाला लिंक करावे लागणार आहे. अन्न व पुरवठा विभागाने रेशन वितरण यंत्रणेचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतल्याने लाभार्थ्यांना रेशन दुकानांमध्ये जाऊन आधार लिंकींग करावे लागणार आहे. यातून गरजू लाभार्थी समोर येणार असून, बोगस रेशन कार्डधारकही समोर येणार आहेत.

लिंक करण्याच्या प्रक्रियेसाठी संपूर्ण जानेवारी महिन्याचा वेळ कार्ड धारकांना देण्यात आला असून ३१ जानेवारी हि अंतिम मुदत आहे.स्वस्त धान्याचा लाभ गरजू लोकांनाच मिळावा,याबरोबरच लाभार्थ्यांचे लिंकिंग असावे यासाठी यंत्रणेचे संगणकीकरण करण्याचा निर्णय अन्न व पुरवठा विभागाने घेतला आहे. लिंकिंग करण्याविषयीची माहिती रेशन दुकानदार देखील कार्डधारकांना देणार आहेत. या मोहिमेतून रेशनकार्ड पुरवठा विभागातून नक्की किती कार्डांचे वाटप झाले, हि संख्या समोर येणार असल्याने पर्यायाने बोगस कार्ड धारक किती आहेत हेही समजणार आहे. म्हणून रेशन कार्डला आधार व मोबाईल नंबर लिंक करणे बंधनकारक केले आहे.

1 reply

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.