चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा छळ, सासरच्या तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड : लग्नात विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी सोन्याचे दागिने आणि कार दिली नाही. तसेच विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ करण्यात आल्याची घटना इंदिरानगर, मांजरी खुर्द येथे 21 जानेवारी 2020 ते 1 जानेवारी 2021 या कालावधीत घडली. याप्रकरणी सासरच्या तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती तुषार सोनवणे (वय 32), सासरे सुरेश श्रीरंग सोनवणे, सासू नंदा सुरेश सोनवणे (तिघे रा. काळेवाडी, वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेच्या माहेरच्या लोकांनी तिच्या लग्नात सोने दिले नाही. चार चाकी गाडी घेण्यास पैसे दिले नाहीत, असे म्हणत तसेच विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वारंवार शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली. विवाहितेच्या भावाला देखील आरोपींनी मारहाण केली. विवाहिता गरोदर असताना देखील तिला मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.