पुणे व अहमदनगर जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल दरोडेखोर जेरबंद
पुणे : पुणे व अहमदनगर जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल दरोडेखोरांना आळेफाटा पोलिस गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या दरोडेखोरानी मागील चार-पाच महिन्यात ओतूर, आळेफाटा, मंचर लोणीकंद,पारनेर भागात त्यांच्या इतर साथीदारांसोबत घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.
विशाल उर्फ कोंग्या नरेश काळे (वय २६ रा. निघोज ता.पारनेर जि. अ.नगर), दिपक उर्फ आशिक आझाद काळे (वय २५ रा. निघोज ता. पारनेर जि.अ नगर)अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,१४ डिसेंबर रोजी आळेफाटा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी झाली होती. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीसांनी आरोपींची माहिती घेण्यासाठी आळेफाटा,पारनेर,निघोज,साकोरी या भागात शोध सुरू केला असता बातमीदारा मार्फत पोलिसांना माहिती मिळाली की फरार आरोपी विशाल हा टाकळी हाजी परिसरात येणार आहे. त्यानुसार निघोज बाजूकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलीसांनी सापळा लावून दोन्ही आरोपींचा पाठलाग करून त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पोलीसांनी अधिक चौकशी केली असता त्यांनी मागील चार- पाच महिन्यात ओतूर, आळेफाटा,मंचर, लोणीकंद,पारनेर या भागात त्यांच्या इतर साथीदारांसोबत घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उप. विभा. पो.अधिकारी. मंदार जवळे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. नेताजी गंधारेे,सफो.दत्तात्रय गिरमकर,पोहवा. हनुमंत पासलकर,पोहवा. उमाकांत कुंजीर, पोहवा.विक्रम तापकीर,पोहवा. सचिन गायकवाड,
पोहवा. काशीनाथ राजापूरे,पोना.दिपक साबळेे,पोना. जनार्दन शेळके,पोना. राजू मोमीन,पोना. अजित भुजबळ,पोना. मंगेश थीगळे,पोशी.संदीप वारेे,पोशी. अक्षय नवले,पोशी. निलेश सुपेकर,
पोशी.अक्षय जावळे यांनी केली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!