पुण्यातील कुख्यात टोळीतील तिघांना अटक; 38 लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे : हडपसर पोलिसांनी शहरातील कुख्यात टोळीच्या तिघांना चोरीचा माल विकताना रंगेहाथ पकडुन अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीच्या चार चारचाकी, पाच दुचाकी, 33 मोबाईल, सोने व चांदीचे दागिणे असा 38 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कन्वरसिंग कालुसिंग टाक(वय 20, रा.हडपसर), अजयसिंग अर्जुनसिंग दुधाणी (वय 20,रा.मांजरी), जयसिंग कालुसिंग जुनी (वय 27,रा.हडपसर) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,हडपसर पोलिसांच्या गस्ती पथकाला काळेपडळ येथे तीन व्यक्ती संशयास्पदरित्या दुचाकी घेऊन उभे असल्याची खबर मिळाली होती. त्यानूसार गस्ती पथक घटनास्थळी गेले. तेव्हा त्यांना टाक व दुधाणी हे मोबाईल व सोन्याचे दागिणे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना विकत असल्याचे दिसले. तर जुनी हा दुचाकीवर बसला होता.पोलिसांनी तातडीने त्यांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरुन त्यांच्याकडून एक दुचाकी, सोन्याची चेन व सात मोबाईल हस्तगत करण्यात आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली असता, त्यांनी एकूण पाच घरफोडीचे गुन्हे, चारचाकी चोरीचे चार, दुचाकी चोरीचे पाच व मोबाईल चोरीच्या सात गुन्हयांची कबुली दिली. त्यांनी एकूण 17 गुन्हांची कबुली दिले. त्यांच्याकडून 21 गुन्हे उघडकीस आणून 38 लाख 13 हजाराचा मुद्देमाल जप्त केला गेला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक राजु अडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, उपनिरीक्षक सौरभ माने, पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे, प्रताप गायकवाड, पोलीस अंमलदार सैदोबा भोजराव, समीर पांडुळे, संदिप राठोड, नितीन मुंढे, अकबर शेख, शशिकांत नाळे, शाहीद शेख, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, उमाकांत स्वामी, निखील पवार यांच्या पथकाने केली.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!