WhatsApp ची नवी पॉलिसी अॅक्सेप्ट करा, नाहीतर अकाउंट Delete करा

नवी दिल्लीः फेसबुकची मालकी असलेल्या इंस्टेंट मेसेजिंग अॅप WhatsApp ने आपली टर्म्स आणि प्रायव्हसी पॉलिसीला अपडेट केले आहे. याचे नोटिफिकेशन भारतात मंगळवारपासून हळूहळू युजर्संना देण्यात येत आहे. व्हॉट्सअॅपने युजर्संना नवीन पॉलिसीला अॅक्सेप्ट करण्यासाठी ८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत डेडलाईन दिली आहे.जे युजर्स व्हॉट्सअ‍ॅपची नवी पॉलिसी स्वीकारणार नाहीत त्यांना WhatsApp अकाउंटचा अ‍ॅक्सेस मिळणार नाही. म्हणजेच WhatsApp चा वापर करण्यासाठी तुम्हाला कंपनीच्या अटी स्वीकारणं अनिवार्य असेल.

युजरने WhatsApp ओपन केल्यानंतर स्क्रीनवर नवीन पॉलिसी दिसेल, ही पॉलिसी स्वीकारण्यासाठी तुम्हाला Accept Now पर्यायावर क्लिक करावं लागेल. थोड्या कालावधीसाठी पॉलिसी स्वीकारायच्या नसल्यास तुम्ही ‘नॉट नाउ’ या पर्यायावरही क्लिक करु शकतात. पण या पॉलिसी स्वीकारण्यास नकार दिल्यास तुम्हाल व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट वापरता येणार नाही.जर तुम्ही नवीन पॉलिसीला काही वेळेसाठी अॅक्सेप्ट केले तर तुमचे अकाउंट सुरू राहिल.

काय आहे नवी पॉलिसी? 

व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन अटींमध्ये नववर्षात युजर्सच्या डेटाचा वापर कशाप्रकारे केला जाईल याची माहिती देण्यात आली आहे. तसेच, युजर्सचा चॅटिंग डेटा कशाप्रकारे स्टोअर आणि मॅनेज केला जातो, याशिवाय फेसबुक बिजनेससाठी तुमची चॅट कशाप्रकारे मॅनेज केली जाईल याबाबतही माहिती देण्यात आली आहे. नव्या पॉलिसीमध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामचं जास्त इंटीग्रेशन आहे. म्हणजे आता युजर्सचा आधीपेक्षा जास्त डेटा फेसबुककडे जाईल. व्हॉट्सअॅपचा डेटा आधीपासूनच फेसबुकला दिला जातो. पण आता फेसबुक आणि इस्टाग्रामवर इंटीग्रेशन जास्त होईल असं कंपनीने स्पष्ट केलंय.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.