पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन युवकावर कोयत्याने सपासप वार

पुणे : पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन युवकावर कोयत्याने सपासप वार केल्याची घटना खेड तालुक्यातील आसखेड बुद्रुक गावच्या हद्दीत गुरुवारी (दि.7) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी शुक्रवारी (दि.8) पोलीसांनी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

राकेश महादु गाडे (वय-34 रा. आसखेड बुद्रुक, ता. खेड) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव असून त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राजेंद्र साहेबराव गाडे याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शेतातील काम संपवून दुचाकीवरुन (एमएच 14 एवाय 2109) पांदीच्या रस्त्याने घरी जात होते. त्यावेळी आरोपीने दुचाकीवरुन येऊन ‘तुला माज आला आहे का, तू मझ्या बायकोला फोन का करतोस’ अशी विचारणा केली. फिर्यादी यांचे पत्नीसोबत संबंध असल्याच्या संशयावरुन आरोपीन कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये राकेश यांच्या तोंडावर आणि डोक्यावर वार करुन गंभीर जखमी केले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राठोड करीत आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.