व्हॉटस्अपवरून ऑनलाईन पद्धतीने कल्याण व मिलन मटका जुगार घेणा-या तिघांना अटक
पिंपरी चिंचवड : व्हॉटस्अपवरून ऑनलाईन पद्धतीने कल्याण व मिलन मटका जुगार घेणा-या तीन जणांवर दिघी पोलीसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून 1 लाख 11 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 8) सायंकाळी सातच्या सुमारास च-होली फाटा याठिकाणी करण्यात आली.
रोहन एकनाथ तापकीर (वय 29, रा. च-होली), महेश हरिशचंद्र नर्हे (वय 29, रा. च-होली) व आकाश शंकर तापकिर (वय 28, रा. च-होली ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना सीआरपीसी 14 (अ) (1) प्रमाणे नोटीस बजावण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वतःच्या फायद्यासाठी व्हॉटस्अपवरून ऑनलाईन पद्धतीने कल्याण व मिलन मटका घेत असताना पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्याकडून 1 लाख 11 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक एच. एम. आव्हाड अधिक तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!