सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग…..

भंडारा; सामान्य रुग्णालय भंडारा येथील दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची घटना आज दिनांक. ९ जानेवारी मध्यरात्री २ च्यासुमारास घडली असून रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. सदर आग ही नवजात शिशु कक्षा लगत लागली असून वार्ड क्रमांक ६,७ मधील रुग्ण सुरक्षित आहेत, काही जीवित हानी झाली असल्याची पुष्टी अजून झाली नाही.आग नियंत्रण करण्यात आणि रुग्णांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्यात भंडारा पोलीस आणि सामान्य रुग्णालयातील कर्मचारी यांनी अथक प्रयत्न केले असून जिल्हा शल्य चिकित्सक, तसेच सर्व डॉक्टर ,भंडारा पोलीस,नगर परिषद कर्मचारी,जिल्हाधिकारी,अप्पर पोलीस अधीक्षक आदी घटना स्थळी पोहचले होते.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.