चाकूने वार करत आईसह ४ वर्षीय चिमुकलीचा खून, वाल्हेकरवाडीत खळबळ

पिंपरी चिंचवड : एका बंद खोलीत आई व तिच्या चिमुकल्या मुलाचा मृतदेह आढळून आल्याची घटना वाल्हेकरवाडी येथे शनिवारी रात्री नऊच्या सुमारास उघडकीस आली. अज्ञात व्यक्तीने चाकूने वार करून त्यांचा खून केला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.सुमय्या नासिर शेख (वय ४०) तिचा मुलगा आयान (वय ४) असे खून झालेल्या माय लेकरांची नावे आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्हेकरवाडी येथील एका बंद खोलीतून दुर्गंधी येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी पाहणी केली. त्यावेळी खोलीत सुमय्या व तिचा मुलगा आयान यांचे मृतदेह आढळून आले. मृतदेहाच्या शेजारी रक्ताने माखलेला चाकू सापडला. तसेच घराबाहेर बीयरच्या बाटल्या, बिस्कीटचे पुडे, चॉकलेटही पडलेले होते.

पोलिसांनी घरमालकाकडे चौकशी केली असता रिक्षाचालक असलेल्या दोन तरुणांना १५ डिसेंबर रोजी खोली भाड्याने दिली होती, असे घरमालकाने सांगितले. बुधवारपासून (६ जानेवारी) दोन्ही तरुण फरार आहेत. सुमय्या व तिचा मुलगा नेमके कोठून आले; तसेच या ठिकाणी कधीपासून राहात आहेत, याचा शोध पोलिस शोध घेत आहेत. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.