टिंडर डेटिंग अॅपवरून मैत्री करून तरुणाने केला विधवा महिलेवर बलात्कार

पिंपरी चिंचवड : टिंडर डेटिंग अॅपवरून विधवा महिलेसोबत ओळख करून एका तरुणाने तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार 12 जून 2020 पासून 24 सप्टेंबर 2020 या कालावधीत जे डी पॅराडाईस ताथवडे, स्टे-इन हॉटेल पुनावळे,कम्फर्ट एक्झिक्युटिव्ह हॉटेल मारुंजी, द आदिती इन हॉटेल विनोदे वस्ती हिंजवडी येथे घडला आहे.याप्रकरणी एका तरुणावर वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

अमन दीपक सिंग (वय 29, रा. डांगे चौक, थेरगाव) असे गुन्हा
दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने
वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी अमन आणि पीडित
महिलेची ओळख टिंडर या डेटिंग अॅपवरून झाली. त्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. त्यानंतर अमन याने महिलेला लग्नाचे अमिश दाखवले. महिला विधवा असल्याचे माहिती असताना अमन याने तिला ताथवडे, पुनावळे, मारुंजी, हिंजवडी येथील विविध हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. महिलेने त्याला लग्नाबाबत विचारले असता त्याने महिलेच्या तोंडावर बूट फेकून मारला आणि लग्नाला नकार दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.