विनापरवाना गावठी पिस्तुल जवळ बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

मावळ(नवनाथ आढाव) : नाणे रेल्वे गेटजवळ विनापरवाना गावठी पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे जवळ बाळगणाऱ्या आरोपीसह एका अल्पवयीन मुलाला कामशेत पोलिसांनी अटक केली आहे. हि कारवाई आज रविवार (दि. १०) रात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

त्यानुसार प्रतीक अर्जुन निळकंठ (वय २१, रा छावा चौक, कामशेत ता मावळ), याच्यासह एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस नाईक रामचंद्र ज्योतिराम कानगुडे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार (दि. १०) रात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास यातील दोन्ही आरोपी नाणे रेल्वे गेटचे जवळ विनापरवाना गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसे जवळ बाळगुन असल्याचे खात्रीशीर माहिती

पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आरोपी प्रतीक निळकंठ याच्यासह एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता ड्युट स्कुटरवर आरोपी प्रतीक याच्याकडे विनापरवाना गावठी पिस्तुल व अल्पवयीन आरोपीकडे दोन जिवंत काडतुसे मिळून आली. आरोपींकडून एकुण ५१ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असुन पुढील तपास पो हवा समीर शेख करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.