फरसाण उधार न दिल्याच्या रागातून दुकानदारावर कोयत्याने वार, कोंढव्यात खळबळ
पुणे :फरसाण उधार न दिल्याच्या रागातून अल्पवयीन मुलांनी दुकानदारावर कोयत्याने वार केल्याची घटना कोंढाव्यात घडली आहे. दोघेही अल्पवयीन पसार झाले आहेत. यामुळे परिसरातील दुकांदारामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याप्रकरणी अजय प्रजापती (वय 21, रा. पुणे,कोंढवा पोलीस,गुन्हा दाखल,कोंढवा खुर्द) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार 16 आणि 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलावंर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे काकडे वस्तीत श्रीकृष्ण भेळ आणि फरसाण स्नॅक्स सेंटर आहे. दरम्यान दोघेही फिर्यादीच्या ओळखीचे आहेत. त्यांनी यापूर्वी देखील येथून उधार भेळ व फरसाण घेतले होते. तर दोन दिवसांपूर्वी पुन्हा ते फरसाण आणि भेळ घेण्यासाठी आले होते. त्यानी वेफर्स मागितली. पण फिर्यादी यांनी त्यांना पूर्वीचे पैसे द्या असे म्हणत वेफर्स देण्यास नकार दिला. यावरून दोघांनी वाद घालत फिर्यादी यांच्यावर प्राणघातक हल्ला करत कोयत्याने सपासप वार केले. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता. दोघे अल्पवयीन मुले घटनेनंतर पसार झाले. फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक स्वराज्य पाटील हे करत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!