महाराष्ट्रात ‘बर्ड फ्लू’चा धोका वाढला ; परभणीत ८०० कोंबड्यांचा मृत्यू

मुंबई :राज्य अगोदरच कोरोनच्या संकटाशी सामना करत आहे, अशातच आता नवीन संकट उभं राहिलंय, तेबर्ड फ्लूच्या रूपात. परभणीच्या मुरुंबा गावातील  ८०० कोंबड्या बर्ड फ्लूने मृत पावल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. आता परभणीच्या सेलू तालुक्यातील कुपटा गावात सुद्धा २ कुकुट पालकांच्या पाचशे कोंबड्यांचा मृत्य झाल्याची माहिती समोर आली आहे. मागील पाच सहा दिवसात या कोंबड्या मेल्या आहेत. सेलू तालुक्यातील कुपटा गाव परिसरात गावरान कोंबड्यांचे शेतीला जोडधंदा म्हणून संगोपन करीत असतात. या गावातील पाचशे कोंबड्या अज्ञात रोगाने मृत पावल्याची माहिती आहे. कुपटा येथील मोहन जाधव यांच्या ४५० आणि समाधान दुधवडे यांच्या ५० कोंबड्या अज्ञात रोगाने मृत पावल्या आहेत.

सात राज्यानंतर महाराष्ट्रातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाला असं म्हणावं लागेल. परभणीत मुरुंबा गावात ८०० कोंबड्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू तर सेलू तालुक्यातील कुपटा गावात ५०० कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची माहिती भोपाळच्या राष्ट्रीय प्रयोग शाळेने दिली आहे. मुरुंबा आणि कुपटा गाव बर्ड फ्लू संसर्गित म्हणून घोषित करण्यात आला आहे.

गावात १ किलोमीटरच्या आतल्या कोंबड्या, पाळीव पक्षी नष्ट करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहे. १० किलोमीटर अंतरापर्यंत कोंबडी खरेदी-विक्रीवर बंदी करण्यात आली आहे. तसेच गावातल्या लोकांचीही वैद्यकिय तपासणी होणार आहे.

केरळ, राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि उत्तरप्रदेशनंतर आता महाराष्ट्रातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. परभणी जिल्ह्यातील मुरुंबा आणि कुपटा गाव  बर्ड फ्लू संसर्गित म्हणून घोषित करण्यात आलं आहे.  मुरुंबा गावात ८०० कोंबड्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाल्याचं उघड झालं आहे .

गेल्या ३ दिवसात कोंबड्याचे हे मृत्यू झालेत भोपाळच्या राष्ट्रीय प्रयोग शाळेने ही माहिती दिली आहे. तर सेलू तालुक्यातील कुपटा गावात सुद्धा २ कुकुट पालकांच्या पाचशे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची माहिती उघड झाली आहे.  पाच सहा दिवसात या कोंबड्या मेल्याची नोंद झाली आहे.

स्थानिक पातळीवरबर्ड फ्लूहारोग नियंत्रात आणणं शक्य आहे. पशुसंवर्धन विभाग उपाययोजना करत आहे. उर्वरीत महराष्ट्रात चिकन आणि अंडी खरेदी विक्रीवर आणि खाण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. तसेच अशी आवश्यकताही नाही, असं पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

परभणी जिल्ह्यात अलर्ट

मुरुंबा गावातली सर्व पक्षी नष्ट करण्यात येत असले तरी संपूर्ण परभणी जिल्ह्यात अलर्ट घोषित करण्यात आलाय. जिल्हाप्रशासन परभणी जिल्ह्यात पक्ष्यांचा सर्वे करणार आहे. इतर कुठे बर्ड फ्ल्यूचा प्रसार झालाय का याची माहितीसुद्धा प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे.

दरम्यान, स्थलांतरित पक्ष्यांमुळे जिल्ह्यात बर्ड फ्लू आल्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त केला जातोय. कोरोनाचं संकट संपूर्णत: दूर झालं नसताना आता बर्ड फ्लू आल्याने काळजी व्यक्त केली जात आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.