मावळात विनापरवाना शस्त्र बाळगणार्‍या दोघांना अटक

मावळ(नवनाथ आढाव):  विनापरवाना शस्त्र बाळगणार्‍या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.त्यांच्याकडून एक गावठी पिस्टल व 2 जिवंत काडतुस जप्त करण्यात  आली आहे. हि कारवाई वडगाव पोलिसांनी रविवार (दि. १०) पहाटे १ वाजण्याच्या सुमारास जुना पुणे मुंबई महामार्गावर जांभूळ फाटा येथे केली.

रोहित संजय आंद्रे ( वय २० रा. कुसगाव तालुका मावळ जिल्हा पुणे ) व अमोल वहिले ( वय १९ रा. लम्बोदर चौक ढोरेवाडा वडगाव ) असे वडगाव पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक दिलीप गंगाराम सुपे यांनी फिर्याद दिली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुना पुणे मुंबई महामार्गावर जांभूळ फाटा येथे पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन सुरू असताना रविवारी (दि.१०) पहाटे एक वाजण्याच्या सुमारास महामार्गालगत असलेल्या एका हॉटेल जवळ दोन तरुण संशयास्पद रित्या उभे असलेले दिसले. त्यांच्याकडे चौकशी केली असता यातील दोन्ही आरोपी त्यांच्याकडे असणाऱ्या दुचाकीने पाळायला सुरुवात केली यावेळी पोलीस उपनिरीक्षक वडोदे, पोलीस हवालदार संतोष माने, पोलीस नाईक सुपे, गणेश तावरे, रविंद्र राय, विरणक, होले, प्रतिक बनसोडे, मनोज कदम, अंकुश पाटील, सकपाळ, होम गार्ड पिचड, भालशिंगे, बोऱ्हाडे, यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.त्याच्याकडून एक गावठी पिस्टल व 2 जिवंत काडतुस असा एकूण 40 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पो नि सुरेश निंबाळकर यांचे मार्गदर्शन खाली पो.स.ई  विजय वडोदे करत आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.