लॉजमध्ये जाताय तर सावधान, असे ओळखा छुपे कँमेरे

आजकाल छुपा कॅमेरा वापरून महिलांचे आणि मुलींचे नको असलेल्या अवस्थेतील फोटो काढले जातात, व्हिडियो रेकॉर्डिंग केली जाते. आणि मग अनेक वेबसाईट्स हे फोटो आणि व्हिडियो व्हायरल केले जातात.

तुम्ही सुद्धा प्रवासादरम्यान एखाद्या हॉटेल किंवा लॉज मध्ये थांबणार असाल तर किंवा एखाद्या कपड्याच्या दुकानात कपडे खरेदी करून चेंजिंग रूम मध्ये जात असाल तर मित्रांनो या गोष्टींकडे अगदी गांभीर्याने लक्ष द्या.

आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्या द्वारे तुम्ही ओळखू शकाल कि त्या रूम मध्ये छुपा कॅमेरा तर नाही ना. अगदी साध्या सोप्प्या टिप्स आहेत ज्या फॉलो करा आणि तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे संरक्षण करा.

पहिली टीप

तुम्ही ज्या रूम मध्ये थांबनार आहात तिथे गेल्याबरोबर रूम मधील सर्व लाईट्स ऑफ करा. आणि नंतर त्या खोली मध्ये रेड लाईट किंवा ग्रीन लाईट दिसतेय का याच जरा निरीक्षण करा.

जर त्या रूम मध्ये लाल रंगाची लाईट चमकत असेल किंवा हिरव्या रंगाची लाईट चमकत असेल तर लक्षात ठेवा ती जी लाईट आहे तो छुपा कॅमेरा असू शकतो.

दुसरी टीप

तुम्ही ज्या रूम मध्ये गेलेले आहात त्या रूमच्या दरवाजाला असलेला हॅन्डल एकदा चेक करा. जवळजवळ 50 टक्के केसेस मध्ये हॅन्डल आणि दरवाजाला असेलेल्या हुक मध्ये छुपे कॅमेरे लावले जातात. त्याच बारकाईनं निरीक्षण करा.

तिसरी टीप

मित्रांनो हे जे हिडन कॅमेरे असतात त्यांना एक मायक्रो फोन सुद्धा जोडला गेलेला असतो. आणि या मायक्रो फोनचा सतत बारीक आवाज येत असतो.

आणि म्हणून रूम मध्ये गेल्या नंतर सर्व लाईट तुम्ही बंद करणारच आहात मात्र त्याच बरोबर अगदी बारकाईनं कान लावून बारीक असा आवाज सतत येतोय का हे पहा.

एक विशिष्ट प्रकारचा आवाज सतत येत असेल तर त्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्या.

चौथी टीप

मित्रांनो प्रत्येक रूम मध्ये तुम्हाला आरसा सापडेलच. विशेष करून ज्या ट्रायल रूम असतात जिथे आपण कपडे चेंज करतो त्या ठिकाणी तर आरसा लावलेलाच असतो. मित्रांनो कधी कधी हे आरसे फसवे असतात कारण हे आरसे आरपार असतात.

या आरश्याच्या पाठीमागे कॅमेरे लावलेले असतात. आरसा आरपार आहे कि नाही हे कसे ओळखावे? मित्रांनो त्या आरशाला तुम्हाला तुमच्या हाताचे एक बोट चिटकवायचं आहे, आपलं बोट आणि आरशात दिसणार बोट यामध्ये जर गॅप दिसला तरच हा आरसा आहे असे समजावे.

आरशातील बोट आणि तुमचं बोट जर एकमेकांना चिटकल तर लक्षात ठेवा हा आरसा नाहीये. हा दिसणारा आरसाच आहे पण तो आरपार आहे. पलीकडून छुपे कॅमेरे लावले आहेत आणि त्यांना तिकडून सर्व काही दिसत आहे. हि एक टेस्ट अतिशय महत्वाची आहे.

पाचवी टीप

आपल्या रूमचे सर्व कोपरे चेक करा. बऱ्याचदा छुपे कॅमेरे हे कोपऱ्यांमध्ये लावलेले असतात. त्यामुळे कोपरे अगदी बारकाईने बघा. कोपऱ्यांत कुठे बारीकशी लाईट चमकत आहे का हे लक्ष पूर्वक बघा.

सहावी टीप

आपल्या रूमचा जो दरवाजा आहे त्या दरवाजाच्या खाली कुठेही फट नाहीये ना? कुठेही प्रमाणापेक्षा जास्त स्पेस नाहीये ना हे एकदा चेक करा.

आजकाल अगदी लहान लहान कॅमेरे बाजरात भेटतात, कि तुम्ही रूम मध्ये गेल्या नंतर हे कॅमेरे अलगद आतमध्ये सरकवले जातात आणि आतील सर्व घडामोडी रेकॉर्ड केल्या जातात.

मित्रांनो यावर खूप सारे उपाय देखील आहेत. जरासं महाग आहे पण हिडन कॅम डिटेक्टर या नावाचं एक डिवाइस मिळत. हे तुम्ही विकत घेऊ शकता. ते डिवाइस तुम्हाला सांगेल कि तुमच्या रूम मध्ये कुठे छुपे कॅमेरे लावले आहेत.

हे जर शक्य नसेल तर काही मोबईल अँप सुद्धा आहेत. बॉडीगार्ड नावाचं एक अँप आहे ते अँप सुद्धा तुम्ही वापरू शकता. मात्र ते तुम्हाला खरी माहिती देईलच याची खात्री नाहीये.

यावर अतिशय चांगला असा उपाय म्हणजे तुम्ही रूम मध्ये गेल्या नंतर तुमच्या मोबाईलच नेटवर्क गायब झालं, किंवा ज्या नेटवर्कच्या काड्या असतात त्या कमी जास्त झाल्या किंवा रूमच्या बाहेर रेंज येतेय पण रूमच्या आत आल्यावर रेंज जात असेल तर मित्रांनो लक्षात घ्या त्या रूम मध्ये 100 टक्के छुपा कॅमेरा आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.