NIXI देणार स्थानिक भारतीय भाषांमध्ये विनाशुल्क डोमेन.

 

नवी दिल्ली : नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडियाने नोंदणी कर्त्याने घेतलेल्या प्रत्येक भारतीय डोमेन सोबत 22 अधिकृत भारतीय भाषांपैकी कोणत्याही भाषेत विनाशुल्क IDN (इंटरनॅशनलाईज्ड डोमेन नेम) म्हणजेच आंतरराष्ट्रीय डोमेन नाव निवडता येईल असे जाहीर केले आहे. नोंदणीकर्त्याला स्थानिक भाषेत विनाशुल्क ई-मेल सुद्धा उपलब्ध करून दिला जाईल. भारत (IDN)या डोमेन नावाला प्रोत्साहन मिळावे तसेच स्थानिक भाषेतील सामग्रीचा प्रसार व्हावा या उद्देशाने हा प्रस्ताव देण्यात आला आहे.

हा प्रस्ताव 31 जानेवारी 2021 पर्यंत नोंदणी करणाऱ्या इंटरनेट संकेतस्थळांना “.in” हे डोमेन नाव वापरकर्त्यांसाठी खुला आहे.
तर वापरकर्त्यांपैकी जे त्यांच्या डोमेन नेमचे नूतनीकरण जानेवारी 2021 मध्ये करतील त्यांनाही हा प्रस्ताव खुला आहे.

NIXI बद्दल माहिती

NIXI म्हणजे नॅशनल इंटरनेट एक्स्चेंज ऑफ इंडिया ही 2003पासून कार्यरत असलेली संस्था, ना नफा उद्देशाने कार्यरत असुन खाली दिलेल्या कार्याद्वारे भारतीय नागरिकांमध्ये इंटरनेट तंत्रज्ञानाचा प्रसार करते:-
इंटरनेट एक्स्चेंजेस द्वारे ISP मध्ये आपापसात तसेच ISPs व CDNs मध्ये डेटा विनिमय.
IN डोमेन नोंदणी, IN या देशदर्शक डोमेनचा तसेच भारत IDN या भारतासाठीच्या डोमेनचा कार्यभार, व्यवस्थापन
IRINN, (IPv4/IPv6) या इंटरनेट प्रोटोकॉलचे व्यवस्थापन व कार्य.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.