अमोल वाले टोळीवर मोक्का कारवाई

पिंपरी चिंचवड :निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार अमोल वाले टोळीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अन्वये (मोक्का) कारवाई केली आहे. याबाबतचे आदेश अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी आज (मंगळवारी, दि. १२) दिले आहेत. अमोल वाले यांच्यासह दोन साथीदारांवर ही कारवाई करण्यात आली आहे. परिसरात वर्चस्वासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी ही टोळी गुन्हेगारी कुरापती करत असल्याने पोलिसांनी त्यांच्यावर मोक्काची कारवाई केली.

टोळी प्रमुख अमोल बसवराज वाले (वय 23, रा. इंदिरानगर, ओटास्किम, निगडी), मेघराज ऊर्फ राज संजय वाले (वय 25, रा. इंदिरानगर, ओटास्किम, निगडी), आनंद बसवराज वाले (वय 19, रा. इंदिरानगर, ओटास्किम, निगडी) अशी मोक्काची कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत

सन 2020 साली झालेल्या एका खुनाच्या प्रयत्नाच्या.गुन्ह्यातील आरोपी अमोल वाले, मेघराज वाले आणि आनंद.वाले हे वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे निगडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी उपायुक्त मंचक इप्पर यांच्या मार्फत या टोळीवर मोक्काची कारवाई करण्याचा प्रस्ताव अपर आयुक्तांकडे पाठवला. त्यानुसार अपर आयुक्तांनी या टोळीवर मोक्काची कारवाई करण्याचे आदेश दिले..

सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त  कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे , उपायुक्त सुधीर हिरेमठ,उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक आयुक्त श्रीमती. प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, निगडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख, अंमलदार सचिन चव्हाण, संदिप दानवे, निलेश चासकर यांनी केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.