आनंदाची बातमी ! सिरम इन्स्टीट्यूटमधून कोरोना लशीचे कंटेनर रवाना ; पहिल्या टप्प्यात मध्यप्रदेश आणि गुजरातला लसीचे डोस

६५ लाख डोस आज देशात वितरित होणार

पुणे : देशभरात आज सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. DCGI ने आपत्कालीन वापरासाठी मंजूर केलेल्या कोव्हिशिल्ड लस 16 जानेवारीपासून देण्यात येणार आहे. त्यासाठी आज सीरम संस्थेतून पहिले 3 कोल्ड स्टोरेज कंटेनर आज रवाना झाले आहेत. हे तीन कंटेनर पुणे विमानतळाच्या दिशेनं पोलिसांच्या कडक बंदोबस्तात 4 वाजून 55 मिनिटांनी रवाना झाले आहेत.

यापूर्वी इन्स्टिट्यूटच्या परिसरात कंटेनरची पूजा करण्यात आली. गणपती बाप्पा मोरया… च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. कर्मचाऱ्यांनी कंटेनरसमोर नारळ फोडून या घोषणा देत पेढे वाटून आनंद साजरा केला. पुणे विमानतळावरून पहिले विमान दिल्लीसाठी सकाळी 8 वाजता रवाना होणार आहे. 8 फ्लाईटपैकी 2 फ्लाईट कारगो असून यातील कारगो फ्लाईट पैकी एक हैदराबाद, विजयवाडा आणि भुवनेश्वर, तर दुसरी कोलकता आणि गोवाहाटी येथे जाणार आहे. यावेळा पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.

आज अशाप्रकारची आणखी तीन वाहनं लसीचे डोस घेऊन पुणे एअरपोर्टला रवाना होणार आहेत. काल केंद्र सरकारने कोविशील्ड लसीचे एक कोटी दहा लाख डोस पुरवण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटला ऑर्डर दिल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटकडून आजपासून ही लस पाठवणं सुरु करण्यात आलं आहे.

पुणे झोन-5 च्या डीसीपी नम्रता पाटील यांनी बोलताना सांगितलं की, “कोरोना वॅक्सिनची पहिली बॅच पोलिसांच्या सुरक्षेत पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथून रवाना झाली आहे.”

पुणे एअरपोर्टहून वॅक्सिनच्या एअर ट्रान्सपोर्टची जबाबदारी सांभाळणारी कंपनी एसबी लॉजिस्टिकचे एमडी संदीप भोसले यांनी सांगितलं की, एकूण आठ फ्लाइट्स कोविशील्ड लस पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन देशातील 13 ठिकाणी पोहोचवली जाणार आहे. पहिली तुकडी दिल्ली विमानतळासाठी रवाना करण्यात आली आहे.

10 वाजून 45 मिनिटांनी गुजरातमध्ये दाखल होणार लस

कोविड-19 च्या लसीची पहिली बॅच आज गुजरातमध्ये पोहोचणार आहे. सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी गुजरातच्या अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर लसींची पहिली बॅच उपलब्ध होणार आहे. उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांना सांगितलं की, लसीकरणाशी संबंधित सर्व तयाऱ्या पूर्ण झाल्या आहेत. गुजरातमध्ये कोविड-19 लसीकरण अभियान 25,000 सेंटर्सवर सुरु होणार आहे.

कोविड-19 च्या लसीची पहिली बॅच आज गुजरातमध्ये पोहोचणार आहे. सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी गुजरातच्या अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर लसींची पहिली बॅच उपलब्ध होणार आहे. उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांना सांगितलं की, लसीकरणाशी संबंधित सर्व तयाऱ्या पूर्ण झाल्या आहेत. गुजरातमध्ये कोविड-19 लसीकरण अभियान 25,000 सेंटर्सवर सुरु होणार आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.