गळफास घेऊन महिला पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या

उत्तर प्रदेश :उत्तर प्रदेशातील मोहनलालगंज कोतवालीच्या पीआरव्ही (पोलिस रिपोर्टिंग व्हेइकल) मध्ये तैनात असलेल्या एका महिला पोलीस कॉन्स्टेबलने रविवारी रात्री गळफास लावून आत्महत्या केली आहे. वसतिगृहातील खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस अधिकारी उर्मिलाच्या आत्महत्येमागील कारणांचा शोध घेत आहेत.  तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही

उर्मिला वर्मा (वय 24) असे आत्महत्या केलेल्या महिला पोलीसाचे   नाव आहे. ती शहरातील मऊ भागात वसतिगृहात राहत होती.

मोहनलालगंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्मिला मूळची अयोध्या जिल्ह्यातील आहे. रविरारी रात्री 10 वाजेपासून ती ड्युटीवर होती. मात्र ती ड्युटीवर पोहचली नव्हती. इतक्यात तिच्या वसतिगृहातील एक ओळखीचा माणूस आला आणि खोलीचा दरवाजा बराच वेळ ठोठावत राहिला. जेव्हा दार उघडले गेले नाही. तेंव्हा त्याने बाजूच्या एका महिला नर्सला सांगितले. महिला पोलीस अधिकाऱ्याने खोलीच्या दुसऱ्या दारातून आतील बाजूस पाहिले पाहिले तेव्हा उर्मिलाचा मृतदेह ओढणीने पंखावर लटकलेला पाहून ती स्तब्ध झाली.त्यांनी पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. यानंतर एसीपी प्रवीण मलिक, डीसीपी दक्षिण रवि कुमार घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह खाली उतरवण्यात आला. उर्मिलाच्या घरातील सदस्यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली.कोणतीही सुसाईट नोट सापडली नाही. उर्मिलाच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. तिचा मोबाइलही योगायोगाने सापडला नाही. मोबाइलचा तपास केला जात आहे. याशिवाय इतरही अनेक मुद्द्यांचा शोध घेण्यात येत आहे. उर्मिलाचे कुटुंब आल्यावरच काही माहिती मिळेल

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.