पवना धरणावर ड्रोनचा वापर, प्रशासनाने वेळीच अतिउत्साही पर्यटकांना आवरा

मावळ;पवनाधरण परिसरामध्ये ड्रोनचा वापर या मथळ्याखाली ‘महाराष्ट्र क्राईम वॉचने’ वृत्त प्रसारित केले होते. प्रसारित वृत्ताची दखल घेत काही काळापुरते प्रशासन जागे झाले होते. परंतु पुन्हा जैसै थै….संपुर्ण पिंपरी चिंचवडला पाणीपुरवठा करणारे पवना धरण परिसरात ड्रोन च्या सहाय्याने शुटींग घेताना काही महाठक दिसले, परंतु हे पर्यटकच असले म्हणजे झाले.प्रीवेडींग च्या नावाखाली शुटींग घेवुन राष्ट्रीय मालमत्तेचे नुकसान वा हेरगिरी होऊ शकते.स्थानिक नागरिकांनी आपल्या जवळ मुक्काम करणाऱ्या पर्यटकांना सक्त ताकीद देणे गरजेचे आहे. की धरण परिसरामध्ये ड्रोन चा वापर करू नये. संबंधित विडियोची चौकशी करून दोशींवर कडक कारवाई करण्यात यावी असे स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.