सराईत गुन्हेगार धर्मेश पाटील टोळीवर मोक्काची कारवाई
पिंपरी चिंचवड :पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार धर्मेश ऊर्फ धरम्या पाटील टोळीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.धर्मेश ऊर्फ धरम्या पाटील यांच्यासह चार साथीदारांवर ही कारवाई करण्यात आली आहे. परिसरात वर्चस्वासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी ही टोळी गुन्हेगारी कुरापती करत असल्याने पोलिसांनी त्यांच्यावर मोक्काची कारवाई केली.
टोळी प्रमुख धर्मेश शामकांत पाटील (वय-२५ वर्षे, रा. रा. फलॅट नं. ३०६, गोकुळधाम हौ. सोसा. पुणे.), स्वप्निल संजय कांबळे (वय-२८ वर्षे रा. मोनिका अपार्टमेंट जवळ, आदर्शनगर, पिंपरी, पुणे ), सोनु विनोद पारचा (वय-३० वर्षे रा. तथागत हौ. सोसा. बी-११/१२, मिलींदनगर, पिंपरी, पुणे ), रशिद इर्शाद सय्यद (वय-२६ वर्षे, रा. बालामल चाळ, श्रमिक नगर, पिंपरीगांव, पुणे), राज दत्ता चौरे (रा. संतोष हौ. सोसा. मोठी मस्जिद जवळ, मिलींदनगर, पिंपरी, पुणे) अशी मोक्काची कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत
आरोपी वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून वैयक्तीतरित्या अथवा संघटितपणे दरोडा टाकणे, शस्त्रांचा धाक दाखवुन खंडणी घेणे, खूनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत यासारखे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांनी उपायुक्त मंचक इप्पर यांच्या मार्फत आरोपींच्या विरोधात मोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्याकडे पाठवला होता.
उपायुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त श्रीमती. प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पीसीबी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी त्या प्रस्तावा मधील कागदपत्रांची छाननी करून हा प्रस्ताव अपर आयुक्तांकडे पाठवला. अपर आयुक्त रामनाथ पोकळे यांनी मंगळवारी (दि. १२) मोका अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे , उपायुक्त सुधीर हिरेमठ,उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक आयुक्त श्रीमती. प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश लोंढे, , पिंपरी पोलीस ठाणे तसेच अंमलदार पोलीस हवालदार सचिन चव्हाण, पी.सी.बी. गुन्हे शाखा, पो.हवा. अनिल गायकवाड व पो.शि. ओंकार बंड, पिंपरी पोलीस ठाणे, यांचे पथकाने केली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!