आठवडा बाजारात भाजी विक्रेत्याची निर्घृण हत्या, नागपूर शहर हादरले

नागपूर : जागेवरून झालेल्या वादातून चौघा भावांनी मिळून शस्त्राने सपासप वार करत एका भाजी विक्रेत्या तरुणाची निर्घृण हत्या केली. नागपूर शहरातील आठवडे बाजारात मंगळवारी (दि. 12) दिवसाढवळ्या हा प्रकार घडला आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या भाजी विक्रेत्याला पाहून बाजारात गोंधळ उडाला होता. या घटनेने नागपूर शहर हादरले आहे.हत्या करणारे आरोपी दोन सख्खे तर दोन चुलत भाऊ आहेत.या प्रकरणी चौघा भावांवर गुन्हा दाखल केला आहे.

अक्षय किशोर निर्मले (वय 23 संभाजी कासार मार्ग, मस्कसठ) असे मृत भाजी विक्रेत्याचे नाव आहे  रितेश वर्मा, त्याचे भाऊ निखिल वर्मा, सुमित वर्मा आणि राजू वर्मा असे आरोपीची नावे आहेत. हे चारही जण कळमनात राहतात. आरोपीची आठवडी बाजारात प्रचंड दहशत आहे. ते बाजारात जागा देऊन खंडणी वसुलीही करतात. तर अक्षय निर्मले हा सुद्धा गुन्हेगारी वृत्तीचाच होता. त्याच्याविरोधात हत्येसह इतरही गुन्हे दाखल आहेत. नाईक तालाबचा कुख्यात गुंड पिंटू थावकर याला त्याने दोन वर्षांपूर्वी मारले होते. तो आपल्या भावासोबत मंगळवारी बाजारात भाजीपाला दुकान सुरू करायचा.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी आठवडा बाजार भरला होता. त्याच वेळी बसलेल्या भाजी विक्रेत्यासोबत चौघा भावांनी मिळून वाद घातला. तिथे बाचाबाची झाली एकमेकांची कॉलर धरून हाणामारीपर्यंत प्रकरण गेलेे. चौघांनी भाजी विक्रेत्यासमोरची भाजी सगळी उधळून लावली आणि तिथे वाद चिघळला. जागेवरून झालेला हा वाद हत्येपर्यंत पोहोचला. डोक्यात राग घातलेल्या या 4 भावांची तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्यांनी भाजी विक्रेत्याला बेदम मारहाण केली. धारदार शस्त्राने सपासप वार केले. भाजी विक्रेता रक्ताच्या थारोळ्यात पडला. याची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी चार भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून त्याचा तपास सुरू आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.