चंदगडचे नूतन पोलीस निरीक्षक तळेकर सर्वसामान्य लोकांच्या पाठीशी…

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड पोलीस ठाण्यामध्ये भैरू अंतू तळेकर यांनी नुकताच पोलीस निरीक्षकपदी पदभार स्वीकारला आहे. त्यांचे तालुक्यातील सर्व स्तरातून स्वागत करण्यात येतं आहें.

यावेळी वाहतूक सेना तालुकाध्यक्ष संतोष पाटील यांनी पोलीस निरीक्षक तळेकर यांची सदिच्छा भेट घेत त्यांचे चंदगड पोलीस ठाण्यात नूतन रुजू झाल्यबद्दल स्वागत करून पुढील कार्याला शुभेच्छा देण्यात आल्या.चंदगड तालुक्यातील कायदा सुव्यवस्था सुरळीत राहावी याबाबत सविस्तर भेट घेत चर्चा करण्यांत आली.यावेळी खोट्या केसेस यांना थारा न देता अन्याय होणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहून ते मोडीत काढू,असे मत तळेकर यांनी मांडले.

यावेळी वाहतूक सेना तालुकाध्यक्ष संतोष पाटील, सामाजिक कार्यकर्ते अशोक पेडणेकर, दीपक गावडेसह आदी मंडळी उपस्थित होतें.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.